Sunday, 1 May 2011




  1. अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ.
  2. अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  3. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
  4. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  5. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
  6. अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  7. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  8. अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
  9. अंधारात केले पण उजेडात आले.
  10. अंधेर नगरी चौपट राजा.
  11. अकिती आणि सणाची निचिती.
  12. अक्कल खाती जमा.
  13. अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
  14. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
  15. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
  16. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
  17. अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
  18. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
  19. अघळ पघळ अन घाल गोंधळ.
  20. अघळ पघळ वेशीला ओघळ.
  21. अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
  22. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
  23. अडली गाय खाते काय.
  24. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  25. अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
  26. अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
  27. अढीच्या दिढी सावकाराची सढी.
  28. अती केला अनं मसनात गेला.
  29. अती झालं अऩ हसू आलं.
  30. अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
  31. अती तिथं माती.
  32. अती परीचयात आवज्ञा.
  33. अती राग भिक माग.
  34. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
  35. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
  36. अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
  37. अपयश हे मरणाहून वोखटे.
  38. अपापाचा माल गपापा.
  39. अपुऱ्या घड्याला डबडब फार.
  40. अप्पा मारी गप्पा.
  41. अर्धा वैद्या मरणास खाद्य.
  42. अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
  43. अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
  44. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
  45. अल्प बुध्दी, बहु गर्वी.
  46. अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
  47. अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.
  48. अळी मिळी गुपचिळी.
  49. अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
  50. अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
  51. असं कधी घडे अन सासुला जाव‌ई रडे.
  52. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  53. असतील चाळ तर फिटतील काळ.
  54. असतील मुली तर पेटतील चुली.
  55. असतील शिते तर जमतील भूते.
  56. असुन नसुन सारखा.
  57. असून अडचण नसून खोळांबा.
  58. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  59. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
  60. असेल दाम तर हो‌ईल काम.
  61. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
  62. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
  63. आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?
  64. आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
  65. आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
  66. आंधळीपेक्षा तिरळी बरी.
  67. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
  68. आ‌ई म्हणते लेक झाले, भा‌ऊ म्हणतात वैंरी झाले.
  69. आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
  70. आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
  71. आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.
  72. आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
  73. आखुड शिंगी आणि बहुदुधी.
  74. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
  75. आग लागल्यावर विहीर खणणे.
  76. आगीशिवाय धूर दिसत नाही.
  77. आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
  78. आज अंबारी, उद्या झोळी धरी.
  79. आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर.
  80. आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.
  81. आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
  82. आडजीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.
  83. आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
  84. आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
  85. आधणातले रडतात, सुपातले हसतात.
  86. आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
  87. आधी करा मग भरा.
  88. आधी करावे मग सांगावे.
  89. आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
  90. आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
  91. आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
  92. आधी नमस्कार मग चमत्कार.
  93. आधी पोटोबा, मग विठोबा.
  94. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
  95. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
  96. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
  97. आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
  98. आधीच नव्हती हौस त्यात पडला पा‌ऊस.
  99. आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
  100. आपण आपल्याच सावलीला भितो.
  101. आपण आरे म्हटले की कारे आलेच.
  102. आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
  103. आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
  104. आपण सुखी तर जग सुखी.
  105. आपलंच घर, हागुन भर.
  106. आपला आळी, कुत्रा बाळी.
  107. आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
  108. आपला हात, जग्गन्नाथ.
  109. आपलाच बोल, आपलाच ढोल.
  110. आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
  111. आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
  112. आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
  113. आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
  114. आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
  115. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
  116. आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
  117. आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे.
  118. आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
  119. आपल्या कानी सात बाळ्या.
  120. आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
  121. आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
  122. आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
  123. आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
  124. आय नाय त्याला काय नाय.
  125. आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार.
  126. आयत्या बिळात नागोबा.
  127. आराम हराम आहे.
  128. आरोग्य हीच धनसंपत्ती.
  129. आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
  130. आला भेटीला धरला वेठीला.
  131. आली अंगावर, घेतली शिंगावर.
  132. आली चाळीशी, करा एकादशी.
  133. आली सर तर गंगेत भर.
  134. आलीया भोगासी असावे सादर.
  135. आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
  136. आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
  137. आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
  138. आळश्याला दुप्पट काम.
  139. आळी ना वळी सोनाराची आळी.
  140. आळ्श्याला गंगा दूर.
  141. आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.
  142. आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
  143. आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)
  144. आवसबा‌ई तुझ्याकडे पुतनबा‌ई माझ्याकडे
  145. आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा.
  146. आशा सुटेना अन देव भेटेना.
  147. आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
  148. ओ म्हणता ठो ये‌ईना.
  149. ओठात एक आणि पोटात एक.
  150. ओठी ते पोटी.
  151. ओल्या बरोबर सुके जळते.
  152. ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
  153. ओळखीचा चोर जीवे मारी.
  154. ओसाड गावी एरंडी बळी.
  155. औटघटकेचे राज्य.
  156. औषधावाचून खोकला गेला.




  1. इकडून तिकडून सगळे सारखे.
  2. इकडे आड़ तिकडे विहीर.
  3. इच्छा तसे फळ.
  4. इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.
  5. इजा बिजा तीजा.
  6. ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.
  7. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.






    1. उंच वाढला एरंड तरी हो‌ईना इक्षुदंड.
    2. उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी ये‌ऊ काय?
    3. उंटावरचा शहाणा.
    4. उंदराला मांजराची साक्ष.
    5. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
    6. उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
    7. उचलली जीभ लावली टाळ्याला.
    8. उठता लाथ, बसता बुक्की.
    9. उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
    10. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
    11. उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
    12. उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
    13. उथळ पाण्याला खळखळाट फार.
    14. उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
    15. उधार पाधार वाण्याचा आधार.
    16. उधार तेल खवट.
    17. उधार पाधार वाण्याचा आधार.
    18. उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
    19. उन पाण्याचे घर जळत नसते.
    20. उपट सुळ, घे खांद्यावर.
    21. उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
    22. उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
    23. उश्याच केल पायतर तरी बुड मध्येच.
    24. उसना पसारा देवाचा आसरा.
    25. उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.
    26. उसाच्या पोटी कापूस.
    27. ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
    28. ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.



No comments:

Post a Comment